Type Here to Get Search Results !

जव्हार मोखाडा कापरिचापाडा येथे टेम्पो घरात घुसला.




जव्हार मोखाडा कापरिचापाडा येथे टेम्पो घरात घुसला.

जव्हार प्रतिनिधी - दिनेश आंबेकर.




 बातमी आहे,जव्हार मधून जव्हार,मोखाडा, नाशिक रस्त्यावर टेम्पोला अपघात झाला. जव्हार मोखाडा रस्त्यावर कापरीचा पाडा येथे आईसर टेम्पोच्या चालकाचा ताबा सुटला आणि थेट टेम्पो घराचे पत्रे तोडत घरावर जाऊन आढळला आहे, रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. जव्हार नाशिक या मुख्य रस्त्यावर कापरीचा पाडा याठिकाणी नाशिक कडून जव्हार कडे जाणाऱ्या आईसर टेम्पो शेतकरी बुध्या शंकर जंगली यांच्या घरी रात्री सुमारे दहाच्या दरम्यान नाशिक हुन येताना टेम्पो नंबर एम.पी. जी. जी 84 21 ही गाडी बुध्या शंकर जंगली यांच्या घराला येऊन धडक दिली सुदैवाने या अपघातामध्ये कोणीही जखमी झालं नसले.तरीसुद्धा घराचे नुकसान झाले असून या ठिकाणी टेम्पो पलटी झाला आहे. घटनास्थळी पोलिस पोहोचले असून पंचनामा चे काम चालू असल्याचे गाव प्रतिनिधी यांनी सांगितले.
  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad