Type Here to Get Search Results !

फलटण तालुका शिवसेनेत तरुण युवकांचा जाहीर प्रवेश : प्रदिप झणझणे, शिवसेना फलटण तालुका प्रमुख




हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने अनेकांना आमदार, खासदार, मंत्री बनवलं, पक्षाची पदे बहाल केली, महाराष्ट्रात मान सन्मान, प्रतिष्ठा मिळवून दिली. परंतु चाळीस बंडखोरांनी शिवसेनेशी व निवडुन देणा-या शिवसैनिकांशी गद्दारी करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरु झालेल्या व महाराष्ट्रातील सामान्य जनमाणसाचा प्राण असलेल्या शिवसेना पक्षाला संपवण्याचा डाव आखलेला आहे. स्वतःची कातडी वाचवण्यासाठी व स्वतःच्या स्वार्थासाठी हे चाळीस बंडखोर आमदार ज्या शिवसेनेने नावारुपाला आणलं, त्या शिवसेनेवर व शिवसेनेचे चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर हक्क सांगत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचेशी बेईमानी करुन त्यांना कोणतीही सुचना न देता सुरत, गुवाहाटी, गोवा इत्यादी परराज्यात राहुन पक्ष फोडण्याचे नाही तर पक्ष संपवण्याचे काम सुरु केले. ज्या पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी या बंडखोरांना भरभरून दिले. परंतु शिवसेना आमचीच व शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाणही आमचंच असं सांगुन हिसकावण्याचा व बळकावण्याचा हा कृतघ्नपणाचा प्रकार महाराष्ट्रात चालु आहे. परंतु महाराष्ट्रातील जनता व निष्ठावान शिवसैनिक बंडखोरांचे हे सगळे चाळे ओळखून आहे. महाराष्ट्रातील तमाम निष्ठावान शिवसैनिक व जनता पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचेबरोबर आहे आणि राहील यात काही शंका असण्याचं कारण नाही असे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी ठणकावून सांगितले.

महाराष्ट्रात एकीकडे बंडखोर व त्यांचे समर्थक बाहेर पडत असताना काल फलटण शहरातील तरुण युवकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत फलटण तालुका शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. कारण त्यांना माहिती आहे शिवसेना ही दम खाणारी नाही, दम देणारी संघटना आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी ही संघटना आहे. जगाच्या पाठीवर प्रखर हिंदुत्ववादी संघटना म्हणून ओळखली जाणारी एकमेव शिवसेना ही संघटना आहे. फलटण शहरातील सामाजिक व कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ते अक्षय तावरे यांनी सार्वजनिक विकासासाठी, शहरातील नागरिकांच्या न्यायासाठी, हिंदुत्व वाढीसाठी शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांचे नेतृत्वाखाली फलटण तालुका शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे शिवसेनेचा भगवा हातात घेऊन जाहीर प्रवेश केला. शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे, विभाग प्रमुख तुषार वाडकर, उपशहर प्रमुख राहुल पवार यांनी पुष्पगुच्छ व भगवा झेंडा हातात देऊन अक्षय तावरे, मंगेश खंदारे, आशिष कापसे, अमोल सस्ते, विनोद तावरे, विपुल येवले, सौरभ सोनवले, हेमंत माने, आदींचे शिवसेना पक्षात प्रवेश केलेबाबत स्वागत करण्यात आले. तसेच शिवसेना पक्षवाढीसाठी व त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad