Type Here to Get Search Results !

गुरुजी देता का ? कुणी गुरुजी | अपुऱ्या शिक्षकांन मुळे शैक्षणिक नुकसान

▪️गुरुजी देता का ? कुणी गुरुजी
▪️अपुऱ्या शिक्षकांन मुळे शैक्षणिक नुकसान
▪️परिचर पद रिक्त असल्याने शिक्षकांनाच करावी लागते वर्गाची स्वच्छता




माहागाव प्रतिनिधी / संजय जाधव
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवणाऱ्या विद्यार्थ्यांनच्या शिक्षणाचा बोजवारा जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे योग्य नियोजन नसल्यामुळे उडाला असल्याचा आरोप पालक वर्गातुन होत आहे.




                फुलसावंगी येथील जि.प.माध्यमिक शाळेत सध्या स्थितीत ३१ पदे मंजुर असतांना केवळ १२ शिक्षक तथा शिक्षेत्तर कर्मच्यारी शाळेवर रुजु आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.




    फुलसावंगी येथील जि.प.माध्यमिक विद्यालयात आज स्थितीत वर्ग ०५ ते १० करीता ८२५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.त्या तुलनेत शिक्षकांची संख्या कमी आहे.त्यामुळे विद्यार्थी आहेत पण शिकवायला शिक्षकच नाहीत अशी परिस्थिती सध्या येथील जिल्हा परिषद विद्यालयात बघायला मिळत आहे.

               रिक्त पदाच्या माहिती नुसार सध्या स्थितीत शाळेला वरिष्ठ साहयक,कनिष्ठ साहयकाचे पद रिक्त असून कामकाज करणे कठीण झाले आहे. वर्ग ०५ करिता एकही शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ग रिकामे रहात आहेत.वर्ग ६ ते ८ करिता गणित/विज्ञान विषय शिक्षकांची ४ पदे रिक्त आहेत.तसेच ९ ते १० करिता अवश्यक असणारे भाषा विषयाचे पद रिक्त आहे.शिक्षक संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे.काही वर्गासाठी शिक्षकच नसल्याने वर्ग रिकामे रहात आहेत. तसेच परिचर(शिपाई) चे ५ पदे शाळेत मंजूर आहेत परंतु आज रोजी एकही परिचर शाळेमध्ये नाही त्यामुळे शाळेची स्वच्छता करण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे.एका कर्मच्याऱ्याची परिवेक्षक म्हणुन मागील बदली प्रक्रियेत नियुक्ती झाली परंतु तो ही आज पर्यंत येथे रुजु झाला नाही. शिक्षकांनी शिकवायचे शालेय इतर कामे करायची हा प्रश्न आता शिक्षकांसमोर उभा टाकला आहे.त्यामुळे जि.प.माध्यमिक विद्यालय फुलसावंगी ला रिक्त पदाचे जे ग्रहण लागले ते लवकर सुटणे महत्त्वाचे आहे.त्यामुळे लवकरात लवकर शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचाऱ्यांचा भरणा शिक्षण विभागाणे करावा अन्यथा पालक आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.


▪️ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनचे भवितव्य अंधारात.....

             जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून जी बदली प्रक्रिया राबविण्यात आली, त्यामध्ये शिक्षकांना आपल्या पसंतीच्या शाळेची नावे अनुक्रमे निवडण्याची मुभा देण्यात आली होती, नेमका याच गोष्टीचा फायदा घेत बहुतांश शिक्षकांनी तालुक्याच्या किंवा शहराच्या आजु बाजुच्या एक शिक्षकी शाळाना अनुक्रमे प्रथम पसंत्या दिल्या, ह्या पसंत्या का? दिल्या याचे कारण काही शिक्षकांनी खाजगीत बोलतांना सांगितले त्यामध्ये आपल्या पाल्याचे शिक्षण हे शहरी भागातील नामांकित खाजगी शिक्षण संस्थेत व्हावे हाच मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.

                त्यामुळे परिणामी ग्रामीण भागातील मोठी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेवर कर्तव्य करण्याचे टाळत असल्याचे कारण की, मोठ्या शाळेवर काम करावे लागते त्यामुळे कोणीही शिक्षक अश्या शाळांना पसंती देत नसल्याने त्याचा परिणाम म्हणून शिक्षकांच्या अभावाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनचे शैक्षणिक भवितव्य अंधारात जात आहे. शासनाने याची लवकर दखल घ्यावी अन्यथा येथील रिक्त पदे भरण्यासाठी पालक वर्गा कडुन संविधानीक प्रकारे आंदोलन करण्यात येईल.

          ▪️सौ.रेवती वि. पांढरे
         अध्यक्ष शा.व्य.समिती
       जि.प.मा.विद्यालय फुलसावंगी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad