Type Here to Get Search Results !

वसमत | छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात अतिक्रमण

वसमत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात अतिक्रमण



वसमत येथे आज रोजी अखंड हिंदुस्थानाचे आराध्यदैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा वसमत येथे (शिवतीर्थ ) अश्वारूढ पुतळा असलेल्या परिसरात अनेकांनी अतिक्रमण केलेले आहे. येथे अंडापाव व काहीजण लघवी सुद्धा करत आहेत व काहीजणांनी टपरी हातगाड्या लावून पुतळा परिसरातच कचरा घाण टाकत असल्याचे परिसर अस्वच्छ होत असून याच परिसरातील भिंतीवर या अतिक्रमण धारकांनी आपले नावे टाकली आहेत ती नावे टाकून रंगरंगोटी याठिकाणी करण्यात यावी तसेच या पुतळ्यास दिवसा व रात्री सुरक्षारक्षक नेमण्यात यावा.



तसेच परिसरातील दोन्ही बाजूला अतिक्रमण होऊ नये यासाठी हातगाडे वाल्यांना पाव बंद करण्यात यावा हा परिसर उजळून दिसावा यासाठी याठिकाणी मोठा (हायमास्ट) लाईट लवकरात लवकर बसवण्यात यावा तसेच या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्यास पूजा करण्यासाठी कायमस्वरूपी पायऱ्यांची व्यवस्था करण्यात यावी तसेच शिवतीर्थावर सुरू असलेले कारंजा व लाईट दररोज रात्री किमान दोन तास तरी लावण्यात यावे तसेच या ठिकाणी 50 फूट भगवा ध्वज लावण्यात यावा तसेच सी.सी.टी.व्ही सुद्धा बसवण्यात यावा.

तसेच वसमत शिवउद्यानात दररोज शेकडो नागरिक रात्रीला येत असतात या परिसरातही लाईटची व्यवस्था करण्यात यावी आदी मागण्या तीन ते चार दिवसात मान्य करून तात्काळ सर्व सोयीसुविधा या परिसरात देण्यात यावे अन्यथा आम्हास नाईलाजास्तव तीव्र आंदोलन करण्याची वेळ येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी ही प्रशासनास व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती व उपविभागीय अधिकारी डॉ सचिन खल्लाळ .आमदार राजू भैया नवघरे .नगर परिषद कर्यालय यांना सर्व वसमत शिवप्रेमीच्या वतीने निवेदना द्वारे नम्र विनंती .

त्यावेळी अक्षय भोसले .प्रल्हाद जाधव .सतीश पाटील महागावकर .नामदेव दळवी सर .अविनाश पाटील महागावकर . मनोज भालेराव .विनोद तरंगे .युवराज आडकिने .नागेश चव्हाण .आकाश बोकन .शिवशंकर मुदनर .प्रशांत अण्णा शिंदे . व इतर
शिवप्रेमी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad