Type Here to Get Search Results !

लोणी मध्ये संयुक्त जयंती मोठया उत्सहात साजरी

                                            लोणी मध्ये संयुक्त जयंती मोठया उत्सहात साजरी



  ता.१६/५/२०२२ लोणी ता. आंबेगाव जि. पुणे. या ठिकाणी सम्यक मित्र मंडळ व माजी विध्यार्थी विकास प्रबोधिनी व समस्थ ग्रामस्थ लोणी यांच्या सहकार्याने जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे,अहिल्या देवी होळकर, संत रोहिदास, छत्रपती संभाजी महाराज, संत सावता माळी, लहुजी वस्ताद, विश्वकर्मा महाराज या महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रम सुरू केला. 



यावेळी वकृत्व शालेय स्पर्धेमध्ये विजयी स्पर्धकांचा पारितोषक देऊन सत्कार केला. तनिष्का सुधीर सोनार, सुदर्शन रोहिदास वाळुंज, वैष्णवी सुरेश वाळुंज व सोनल कैलास गायकवाड या विजयी वकृत्व स्पर्धकांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी सुरेख भाषणे केली. यावेळी सविधान या विषयावर गजानन वाघमारे यांनी व्याख्यान दिले व मानवी हक्क या विषयावर गौतम खरात यांनी व्याख्यान दिले. 

यावेळी सम्यक मित्रमंडळातर्फे गावातील विविध संस्थांना सविधान या ग्रंथाचे वाटप केले गेले. यावेळी सेवानिवृत्त विक्रीकर अधिकारी राहुल सोनवणे, सेवानिवृत्त कृषी उपसंचालक प्रकाश सोनवणे, सेवानिवृत्त उपनिरीक्षक दयानंद सोनवणे यांचा सेवानिवृत्ती बद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील प्रत्येक संस्थेला संविधान ग्रंथाची भेट देण्यात आली. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गृह खात्याचे सचिव डॉक्टर कैलास गायकवाड, उद्योजक बाळासाहेब गायकवाड, ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब वाळुंज, सरपंच उर्मिला ताई धुमाळ, समाज भूषण कैलास राव गायकवाड, शरद सहकारी बँकेचे संचालक अशोक पाटील बाळशी राम वाळुंज , पोलीस पाटील संदीप आढाव,सेवानिवृत्त पोलीस अधिकारी प्रकाश वाळुंज, माजी सरपंच दिलीप वाळुंज, शालेय समितीचे अध्यक्ष रोहिदास वाळुंज, माजी सरपंच सावळेराम नाईक, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष संतोष पडवळ माजी प्राचार्य लक्ष्मण वाळुंज, विकास सोसायटीचे चेअरमन शरद वाळुंज उपसरपंच अनिल पंचारास व मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंडळी हजर होती. मुंबई पुणे येथील हे ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज सोनवणे यांनी केले. प्रास्ताविक प्रकाश सोनवणे यांनी केले. अध्यक्षीय मनोगत झाल्यानंतर राहुल सोनवणे यांनी आभार मानले. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष गणेश विष्णू सोनवणे, ज्येष्ठ कार्यकर्ते भास्कर सोनवणे, सचिव राहुल सखाराम सोनवणे, खजिनदार सुरेंद्र सोनवणे व स्थानिक ग्रामस्थ दिगंबर सोनवणे, उत्तम सोनवणे भाऊ सोनवणे, सेवा निवृत्त पोलिस अधिकारी वसंत पंचरास, उत्तम सोनवणे त्यांनी खूप परिश्रम घेतले. कार्यक्रम नंतर सर्व समाजाला गोड जेवण देण्यात आले.

आंबेगाव(पुणे )तालुका प्रतिनिधी कैलास गायकवाड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad