Type Here to Get Search Results !

काळुबाई मंदिर परिसरात लावलेल्या पिंजऱ्याची वन अधिकाऱ्याकडून पाहणी | बिबट्या कोणाला दिसल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन

काळुबाई मंदिर परिसरात लावलेल्या पिंजऱ्याची वन अधिकाऱ्याकडून पाहणी | बिबट्या कोणाला दिसल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन




लोणी-धामणी : प्रतिनिधी :- कैलास गायकवाड
 दिः१२/०४/२०२२. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बागायत पट्यात काही ठिकाणी ऊस तोड झाली आहे.तर काही ठिकाणी ऊस तोड चालू आहे. त्यामुळे दडण कमी होत चालल्यामुळे बिबट्याने आपला मोर्चा जिरायत भागातीत लोणी,धामणी खडकवाडी परिसरात वळविला आहे.त्यामुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोणी,धामणी,खडकवाडी या परिसरात या अगोदर अनेक वेळा बिबटयाचे दर्शन झाले आहे. शिवाय या परिसरात अनेक वेळा बिबट्याने जनावरांनवर हल्ले केले आहेत.



त्यामुळे बिबट्याच्या वावरामुळे या परिसरात चिंतेचे व भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी लोणी गावच्या सरपंच उर्मिला ताई धुमाळ ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत गायकवाड समाजिक कार्यकर्ते बाळासाहेब कोचर यांनी लोणी गावठाणा लागत पिंजरा लावण्याची मागणी केली. सरपंच उर्मिला धुमाळ यांच्याकडे शेतकरी,ग्रामस्यांनी मागणी केली होती.

यातच गेली आठ दिवस लोणी गावात व परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे वनविभागाने वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक एस. बी गिते मॅडम, वनपाल एस यू भालेराव, वन मजूर बाळू लंके रेस्क्यू टीम चे सोन्याबापु लंके यांनी लोणी येथील काळूबाई मंदिरा परिसरात पिंजरा लावल्याने ग्रामस्थ शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.या परिसरात बिबट्या कोणाला दिसल्यास त्वरीत वन विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.

 लोणी ( ता.आंबेगाव ) येथील काळूबाई मंदिर परिसरात लावलेला पिंजरा. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad