Type Here to Get Search Results !

दौलताबाद येथील भिमनगर येथे भिम जयंती उत्साहाने साजरी

दौलताबाद येथील भिमनगर येथे भिम जयंती उत्साहाने साजरी


दौलताबाद/प्रतिनिधी :- प्रकाश लकडे
दौलताबाद :येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली सर्व प्रथम ग्राम पंचायत कार्यालय येथे डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार टाकण्यात आले.त्यानंतर भिमनगर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ यांनी भिम जयंती च्या शुभेच्छा दिल्या. 
याप्रसंगी ग्राम पंचायत सदस्य सैय्यद लायकोद्दीन यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित मार्गदर्शन करताना सांगितले की बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचे यश हे शिक्षण आहे आपण ही आपल्या मुलांना शिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. बाबासाहेबांना अख्ख आयुष्य संघर्ष करावा लागला पण ते परीस्थिती पुढे झुकले नाहीत आज राज्यघटनेमुळेच 130 कोटी भारतीय नागरिक आनंदाने आणि एकोप्याने राहतात हे फक्त बाबासाहेब आंबेडकर यांच्याच मुळे असे बोलताना सैय्यद लायकोद्दीन म्हणाले. 

यावेळी सरपंच ,उपसरपंच,ग्राम पंचायत सदस्य सैय्यद लायकोद्दीन,,रंजीत कांजुणे,जयश्री शिंगारे,सतीष जाधव,मा.सरपंच संजय कांजुणे, रामदास इंगळे,समाजसेवक शेख लाला, कल्याण कांजुणे, भिम जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र हिवराळे, उपाध्यक्ष बाबासाहेब किर्तीकर, 
सुभाष त्रिभुवन,कारभारी गायकवाड,विलास गायकवाड,राजु रूपेकर,उमेश बोर्डे,एकनाथ गायकवाड,शेख बने,सुरेश गायकवाड,

 

श्रावण सिरसाठ,आदिंची उपस्थित होती.उत्सव समितीच्या वतीने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबासाहेब किर्तीकर,राजेंद्र हिवराळे,सोनाजी बोराडे,साहेबराव दिवेकर,प्रकाश किर्तीकर,अशोक किर्तीकर,दिलीप बोर्डे,भारत दिवेकर 
शिवदास पवार,कडु बनसोडे,भिमा बोर्डे,संतोष गायकवाड,राहुल साळवे,संतोष दिवेकर,अशोक दिवेकर,आदिंनी परीश्रम घेतले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad