Type Here to Get Search Results !

मा.नितीन गडकरी साहेब यांचेकडे कुरुल ( सुस्ते )ते पंढरपूर मार्ग विस्तारिकरणाची भाविक वारकरी मंडळाची मागणी

मा.नितीन गडकरी साहेब यांचेकडे कुरुल ( सुस्ते )ते पंढरपूर मार्ग विस्तारिकरणाची भाविक वारकरी मंडळाची मागणी
            




श्री क्षेत्र पंढरपूरला पायी चालत येणारे हजारो वारकरी

 पंढरीसी जारे आल्यानो संसारा |" या संत उक्तीचा स्वीकार करून पायी येतात. ते कुरुल (ता. मोहोळ जि. सोलापूर) ते अंकोली - टाकळी -सुस्ते - पंढरपूर यामार्गा वरून सोलापूर, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, इ. ठिकाणा वरून दिंडी व पालखी घेऊन चालत जातात. या मार्गा वरून हजारो वारकरी भाविक चालत जात आहेत. तसेच प्रत्येक महिन्याला दिंडी घेऊन जाणारे काही भाविक आहेत. या मार्गा वरून माघवारी पालखी सोहळा दरवर्षी भव्य दिव्य रूपात पंढरपूरला जाताना मार्गा वरील रिंगण सोहळे करत जातो. या मार्गावर मोठया प्रमाणात गोल रिंगण,उभे रिंगण केले जात आहे.रिंगण सोहळा होत असल्याने या मार्गाला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.

हा मार्ग सोलापूर जि. प. सर्व साधारणसभे मध्ये" भक्तीमार्ग " पालखी मार्ग म्हणून मंजूर करण्यात आला आहे.या मार्गा वरील काही ग्रामपंचायती मध्ये ग्रामसभेत सुद्धा " भक्तीमार्ग " म्हणून मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गाचे विस्तारिकरण करणे खूप आवश्यक आहे. हा मार्ग 35 कि. मी.असून श्री क्षेत्र पंढरपूरला जोडणारा आहे.सोलापूर ते कुरुल हायवे आहे.कुरुल पासून पुढे राज्य महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला असून या मार्गाचे फोर लेन विस्तारिकरण करून वारकरी भाविकांची सोय करावी अशी मागणी मा.नितीन गडकरी साहेब ( रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री) यांना आ. सुभाष बापू देशमुख यांचे माध्यमातून अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने सुधाकर इंगळे महाराज ( राष्ट्रीय अध्यक्ष ), जोतिराम चांगभले (जिल्हाध्यक्ष ) यांनी लेखी निवेदन देऊन केली.
     तसेच मा.नितीन गडकरी साहेबांनी आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर पालखी मार्ग विस्तारिकरण केले आहे. त्यासाठी त्यांचे अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे कडून " अभिनंदन " करण्यात आले.
               
ह. भ. प. सुधाकर महाराज इंगळे.  (राष्ट्रीय अध्यक्ष अ. भा. वारकरी मंडळ )

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad