Type Here to Get Search Results !

जिवती | शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागून दीड लाखांचे नुकसान

शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागून दीड लाखांचे नुकसान



चंद्रपूर /जिवती प्रतिनिधी मनोज गोरे
जिवती : जिवती शहरात रामनगर वार्ड क्र.०४ दत्ता जयसिंह राठोड यांच्या घरात शॉर्टसर्किटमुळे आग लागून सुमारे दीड लाख रुपयांचे घरातील सामुग्री जळून खाक झाले व नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना सकाळी ०८.४५ वा. च्या सुमारास घडली. सकाळची वेळ होती सयंपाक चालू असलेल्या घरातील गॅस चालू होती आणि घरातील सदस्य घरीच उपस्थित होते. या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही पण घरातील 3 सदस्यांना अगचे चटके बसून हात पायांना दुखापत झाली असून प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये दाखल होऊन उपचार घेत आहेत.

शिलाई मशीन 2 नग, लाकडी बेड व त्या बेडमध्ये कापडे, महत्वाचे कागदपत्रे इतर साहित्य, ट्रेशिंग मध्ये देखील व्यवसायातील जमा पुंजी एकूण अंदाजे 19 हजर चिल्लर जळून खाक, टी वी, होमटेटर, ग्राहकांचे कापडे या आगीत दीड लाख रुपये जळून खाक झाले. घटनास्थळी येथील जिवती शहरात रस्त्याच्या काम चालू असल्याने सकाळी ट्रॅकर मध्ये पाणी भरून रस्त्यावर टाकण्यासाठी भरले होते. तेच ट्रॅकर चा पाणी विझविण्यासाठी उपयोगी ठरला. आगीत घरातील सर्व चीजवस्तू जळून खाक झाल्या. काहीवेळानंतर आग आटोक्यात आली.

शॉर्टसर्किट झाल्यामुळे घरात गॅस चालू असल्याने आगीला वेग मिळाला होता. शेजारच्या नागरिकांना आग विजविण्याचा प्रयत्न करत होते व घरातील टिन असल्याने पूर्ण घराला शर्ट लागत असल्याने 2 3 नागरिकांना करंट चे चटके जोरातच लागले. Mscb ला संपर्क करून लाईट बंद केल्यानंतर आग विजविण्याचा यशस्वी झाले. घटनास्थळी भेट देऊन तलाठी गेडाम पंचनामा केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad