Type Here to Get Search Results !

कै.कृष्णात भाऊ पुरवत यांचा सहकाराचा वारसा जपणारी करकंब नंबर दोन विविध कार्यकारी सोसायटी बिनविरोध......!

कै.कृष्णात भाऊ पुरवत यांचा सहकाराचा वारसा जपणारी करकंब नंबर दोन विविध कार्यकारी सोसायटी बिनविरोध......!

श्री. विठ्ठल कारखान्याचे संस्थापक संचालक ,मा. व्हाईस चेअरमन- कृष्णात भाऊ पुरवत यांचा सहकाराची वारसा जपणारी सोसायटी युवानेते अभिषेक पुरवत यांच्या गटाकडे

करकंब प्रतिनिधी :- लक्ष्मण शिंदे
येथील करकंब नंबर 2 या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ची निवड नुकतीच पार पडली. गेले अनेक वर्षापासून श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना चे संस्थापक कार्य कालापासून ते अगदी व्हॉइस चेअरमन पदापर्यंत कै. कृष्णात भाऊ पुरवत यांनी पंढरपूर तालुक्यामध्ये विशेषता राज्यात आपल्या राजकारणाबरोबरच राजकारणाच्या पलीकडे ही जाऊन सहकार क्षेत्रांमध्ये करकंब या गावाची एक वेगळी ओळख निर्माण करून राजकारणामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केलेला होता. त्यांच्याच माध्यमातून असलेली करकंब नंबर दोन विविध कार्यकारी सहकारी सेवा सहकारी संस्थेची निवड माजी सरपंच दिलीप नाना पुरवत व प्रभाकर भाऊ टेके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या सोसायटीची सूत्रे कै. कृष्णात भाऊ पुरवत व त्यांचा वारसा जपणारे नातू युवा नेते अभिषेक पुरवत यांच्या हाती सर्वांच्या सहमतीने देण्यात आली.

या करकंब नंबर 2 विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालकपदी अभिषेक पुरवत, संजय बोचरे, पांडुरंग देशमुख, चंद्रकांत पांढरे, रघुनाथ शेटे, बाहुबली पुरवत, सारंग पुरवत, संदीप शिंगटे, वसंत दादा शिंदे, कल्पना टेके, तृप्ती पुरवत, लता गायकवाड, जगन्नाथ दुधाने यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीच्या निमित्ताने संस्थेच्या ज्येष्ठ मंडळी तसेच सर्व संचालक सभासद व ग्रामस्थांचे विशेष आभार युवक नेते अभिषेक पुरवत यांनी यावेळी मानून सहकार रत्न कै. कृष्णात भाऊ पुरवत यांचा राजकारणाच्या पलीकडे जाऊन सहकाराचा वारसा जपणारी ही संस्था सर्वांच्याच सहकार्याने ,सर्वांना विश्वासात घेऊन तसेच सर्वांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे निश्चित पणाने या विचारांचा वारसा जपून एक वेगळा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad