Type Here to Get Search Results !

कळमेश्वर तालुक्यातील विविध ग्रामपंचायत मध्ये ई-श्रम, कॅम्पला प्रतिसाद

कळमेश्वर तालुक्यातील विविध ग्रामपंचायत मध्ये ई-श्रम, कॅम्पला प्रतिसाद


कळमेश्वर तालुका: कळमेश्वर तालुक्यातील लिंगा, उपरवाही, MIDC, लोहगड, खापरी, सोनेगाव, विविध ग्रामपंचायत मध्ये ई-श्रम व विविध शासकीय योजना व दस्तऐवज काढण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले. 



विविध ग्रामपंचायत मध्ये हक्कदर्शक कंपनी आणि *जे. एस. डब्ल्यू. फाउंडेशन* यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर घेण्यात आले. शिबिरांर्तगत ई-श्रम कार्ड, किसान सन्मान केवायसी अपडेट, महाडिबीटी, रेजि. शेतीविषयक अवजारे, निराधार पेंशन योजना,हेल्थ कार्ड, आयुष्यमान भारत, नरेगा, सोबतच इतर योजना ज्यांना-ज्यांना लागू पडत आहेत त्यांनाही त्या-त्या योजनेचा लाभ देण्यासाठी अर्ज भरण्यात आले.


ग्रामीण भागातील लोकांना या योजनांचा माहितीअभावी आणि कागदपत्रांची पुर्तता होत नसल्याने या योजनांचा लाभ घेता येत नव्हता. त्यासाठी हे शिबिर घेण्यात आले. जेणे करून ग्रामीण भागातील नागरिक हा शासकीय योजनापासून वंचित राहू नये यासाठी हे शिबिर घेण्यात आले होते. 


यावेळी ग्रामपंचायत सरपंच,साठवणे साहेब, दिपक पाल, नरेंद्र डाहट,किरण वानखेडे,संदिप उपाध्ये, सदस्य, आशाताई, हक्कदर्शकचे प्रकल्प अधिकारी, संदीप कांबळे, मयुर, शितल ताई, पोर्णिमा दहेनकर, महेश, उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad