Type Here to Get Search Results !

करकंब जिल्हा परिषद गटात मनसेचे रेल्वे इंजिन देणार दे धक्का........!

करकंब जिल्हा परिषद गटात मनसेचे रेल्वे इंजिन देणार दे धक्का........!
 
करकंब प्रतिनिधी: करकंब जिल्हा परिषद गटांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण होत असून या करकंब जिल्हा परिषद गटातून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आक्रमक झाली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे तसेच महाराष्ट्र राज्यातील सहकार सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये निश्चित पणाने करकंब जिल्हा परिषद गट पंचायत समिती गणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पवार यांनी व्यक्त केले.
  करकंब जिल्हा परिषद गटात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्याचे सहकार नेते दिलीप बापू धोत्रे यांनी कष्टकरी मजूर सामान्य जनता आणि विशेषता युवकांमध्ये एक वेगळी क्रेझ निर्माण केल्याने करकंब जिल्हा परिषद गटात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने युवकांची मोठी फळी निर्माण केली असल्याने मनसेचे रेल्वे इंजिन धडाडणार असल्याची चर्चा असून करकंब जिल्हा परिषद गटातून व पंचायत समिती गणातून केली जात आहे. त्यामुळे या जिल्हा परिषद निवडणुकीत आता दोघांनाही विसरा... तोचि दिवाळी- दसरा.... चर्चा ऐकावयास मिळत आहे.

              याच करकंब जिल्हा परिषद गटात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले क्रमांक एक व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुली क्रमांक दोन या जिल्हा परिषद शाळा असून येथे केंद्रीय शाळा आहे. तसेच या शाळेच्या लगत रामभाऊ जोशी हायस्कूल असून या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुला-मुलींना तसेच रामभाऊ जोशी हायस्कूल च्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना आणि पालक शिक्षकांना पावसाळ्याच्या दिवसांमध्ये एसटी स्टँड पासून ते शाळेपर्यंत या रस्त्यावरून जाताना अक्षरशा चिखलातून रस्ता शोधत जायची वेळ यायची. त्यावेळी मनसेचे राज्याचे सहकार नेते दिलीप बापू धोत्रे यांनी एसटी स्टँड ते शाळेपर्यंतचा रस्ता मुरमीकरण करून दिला. व या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुली क्रमांक एक या केंद्र शाळेस वीस फुटी लोखंडी मेन गेट बसवूनही दिले. मनसेचे राज्याचे सहकार नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करकंब येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पवार, मनसेचे विद्यार्थी सेना तालुका उपाध्यक्ष सचिन माळी, तालुका उपाध्यक्ष संजय गायकवाड, शहराध्यक्ष बालाजी पवार, विभाग अध्यक्ष गौरव शिंदे, करकंब संघटक ऋषिकेश वाघमारे, माजी शहराध्यक्ष बाबू वेळापूर कर, समीर कोरबु राम धोत्रे समाधान गायकवाड वैभव गायकवाड हनुमंत भोसले विशाल बनकर अक्षय कासार या या पदाधिकाऱ्यां बरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसेचे सैनिक सध्या युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण करीत असून राजकारणाची जोड न देता सामाजिक हित जोपासण्याचे काम करीत असल्याने विशेषता बांधकाम मजूर असलेल्या लोकांसाठी शासनाच्या विविध योजना त्यांच्या पर्यंत पोहचवण्याचे काम करण्याचे प्रयत्नही करीत आहेत .या करकंब जिल्हा परिषद गटात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सामान्य जनतेबरोबर युवकांमध्ये ही आता प्रचंड क्रेझ निर्माण केली आहे. त्यामुळे आगामी होणार्‍या करकंबजिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रेल्वे इंजिन दे धक्का देणार का...? असे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.
z
        या करकंब जिल्हा परिषद गटात गेल्या वीस ते पंचवीस वर्षाच्या कालावधीपासून निधीचा नुसता महापूर येतो, पण या करकंब जिल्हा परिषद गटात करकंब सह या जिल्हा परिषद गटातील येणारे गावे अजूनही आहे त्या स्थितीत आहेत. ना योजना मार्गी लागल्या, ना रस्ते नीट आहेत. कोणत्याही भागाचा विकास आज पर्यंत झालेला नाही.... निधी मात्र मोठ्या प्रमाणात येतो..विकास कामे होत नाहीत, . अशी चर्चा गावा -गावातील लोकांमधून होत आहे.यामुळे या जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थांमधून प्रचंड नाराजी निर्माण झाल्याने ग्रामस्थांतून उलट सुलट चर्चा आहे ऐकावयास मिळत आहे. त्यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने करकंब जिल्हा परिषद गटातील विकास भिमुख करकंब जिल्हा परिषद गट करण्यासाठी मैदानात उतरण्याचे ठरविले आहे. यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्याचे सहकार नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या माध्यमातून सन 2020 -2021 या कोरोना च्या काळामध्ये करकंब व करकंब जिल्हा परिषद गटांमध्ये धान्याचे किट वाटप करून सर्वसामान्यांना एक मोठा आधार देण्याचे काम मनसेच्या माध्यमातून केले गेले. विशेषता दिलीप बापू धोत्रे यांच्या माध्यमातून करकंब असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील अकरा संजीवन समाधी स्थळांचा जीर्णोद्धार करण्याचे सर्वात मोठे धार्मिकअसे महत्त्वपूर्ण काम पूर्ण केले. सामान्य कुटुंबातील बेघर, विधवा, विशेषता कोरोना काळात काम करणाऱ्याआशा वर्कर यांना भाऊबीज भेट म्हणून साड्यांचे व धान्याचे किट वाटप केले. शेतकऱ्यांसाठी युरिया, गणेशोत्सव काळामध्ये गरजू लोकांना गणेशमूर्तींचे वाटप. तसेच दुष्काळामध्ये करकंब येथील स्मशानभूमी, धाकटी वेस, सोमवार पेठ आदी विविध ठिकाणी पाण्याच्या टाकी बसवून पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याचे काम मनसेच्या वतीने करण्यात आलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad