Type Here to Get Search Results !

संत सेवालाल महाराज जयंती निमित्त चिल्ली (ई) ग्रामस्थ व गोरबोली रेडिओ द्वारे होणार ऑनलाईन तांडा कवी संमेलन

संत सेवालाल महाराज जयंती निमित्त चिल्ली (ई) ग्रामस्थ व गोरबोली रेडिओ द्वारे होणार ऑनलाईन तांडा कवी संमेलन.

माहागाव (प्रतिनिधी) :-संजय जाधव
  
 संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त चिल्ली ईजारा ता. महागाव जि यवतमाळ येथील , नायक कारभारी तसेच ग्रामस्थ व ऑनलाईन गोरबोली रेडिओच्या सहकार्यिने ऑनलाईन तांडा कवी संमेलन 
१५ फेब्रुवारी रोजी रात्री ०८:०० ऑनलाईन प्रसारित होणार आहे. 

   
 या ऑनलाईन कवी संमेलनाला महाराष्ट्रातील नवकवीसह गोरबोलीचे दिग्गज कवी उपस्थित राहणार आहे. 
या ऑनलाईन कवी संमेलनाचे संमेलनांध्यक्ष प्रसिद्ध कवी सुरेश राठोड. काटोल, नागपूर असणार आहे.   
गोरबोली बंजारा भाषेचं जतन व संवर्धन तसेच या भाषेतील काव्यलेखन व अनुषांगिक साहित्य निर्मितीला या मुळे चालना मिळेल व बंजारा भाषेतील साहित्य चळवळीला गती मिळेल. डिजीटल माध्यमातून गोरबोली भाषेतील या कविता श्रवणाचा आनंद देशासह जगभरातील  
श्रोत्यांना घेता येईल 
ऑनलाईन गोरबोली रेडिओ संचालक व कार्यक्रम निर्माता एकनाथ गोफणे व चिल्ली इजारा ऑनलाईन तांडा कवी संमेलनाचे मुख्य संयोजक कवी निरंजन मुडे यांच्या पुढाकाराने हे कवी संमेलन संपन्न होणार आहे.
सदर कार्यक्रम सर्व श्रोत्यांना ऑनलाईन गोरबोली रेडीओ व गोरबोली एफ .एम.सह स्वच्छंदी भरारी फेसबुक पेजवरुन ऑनलाईन ऐकता येईल. ...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad