Type Here to Get Search Results !

जि प सदस्य पंकज मुडे यांच्या कडून निंगनूर गणातील कार्यालयांना हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची प्रतिमा भेट

जि प सदस्य पंकज मुडे यांच्या कडून निंगनूर गणातील कार्यालयांना हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची प्रतिमा भेट
प्रतिनिधी निगंनुर : -
                हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व . वसंतराव नाईक यांच्या विचारांची प्रेरणा नव्या पिढीला सदैव कायम राहावी, या हेतूने जि . प . सदस्य पंकज मुडे यांच्या तर्फे येत्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून निंगनूर जि प गणातील गावांमधील सर्व प्रशासकिय कार्यालयांना स्व . वसंतराव नाईक यांची प्रतिमा भेट देण्यात येणार आहे .
         गोर गरीब बहुजन समाज , तसेच दऱ्या खोऱ्यात राहून उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी , बंजारा तसेच सर्व सामांन्यांच्या हितासाठी आपली मुख्यमंत्री पदाची ११ वर्षाची कारकिर्द समाजकार्यास समर्पित करणाऱ्या तसेच तांडा वस्त्यांमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या तसेच अतिदुर्गम भागातील नागरिकांना निवारा ,आरोग्य , विद्यूत , 'पेयजल अशा मुलभूत सुविधा मिळवून देणाऱ्या स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या कार्य कर्तृत्वाच्या आदराची नव्या पिढीतील मुलांना प्रेरणा मिळावी यासाठी निंगनूर गणाचे जि . प . सदस्य पंकज मुडे यांनी दि . २६ जानेवारी २०२२ रोजी आपल्या गणातील सर्व ग्रामपंचायती , आरोग्य केन्द्र , आरोग्य उपकेंद्र , आश्रम शाळा , वाचनालये आदि ठिकाणी स्व . वसंतराव नाईक यांच्या प्रतिमा भेट देणार असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला .यावेळी सरपंच सुरेश बरडे उपसरपंच महेमुनिसाबेगम वलिउल्हाखाँन ग्रामपंचायत सदस्य बाळू जाधव. विजय भोरकडे. व प्रमोद जैस्वाल विजय देवकते .रोहिदास राठोड. मुकतार अलि नवाब सुरेन्द्र मुडे तेजेस राठोड देविदास खंदारे संदिप मुडे मारोती मोतेवाड बालाजी मुडे अविनाश राठोड इमरानखाँन गजानन नावडे योगेश मुडे शरद पंडागळे फारूक खाँन बालाजी माहाले मंगल चव्हाण मागीलाल राठोड असिफ खाँन अंकुश राठोड पि सि भोळे सुशिल गव्हाळे व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील सर्व नागरिक हजर होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad