Type Here to Get Search Results !

15 ते 18 वयोगटातील मुलांनी लसीकरण करून घ्या :- डॉ.शिल्पा जाधव

15 ते 18 वयोगटातील मुलांनी लसीकरण करून घ्या :- डॉ.शिल्पा जाधव

दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य मिळणार

हिमायतनगर प्रतिनिधी/जांबुवंत मिराशे
 केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार शहरातील 15 ते 18 वयोगटातील मुलांनी जानेवारीपासून शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे covaxin चा पाहिला डोस देण्यात येणार आहे त्यासाठी जन्म वर्ष 2007 च्या पूर्वीचा जन्म असणे आवश्यक आहे त्यासाठी आजच ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून घ्या अन्यथा ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर येथे येऊन आपले नाव नोंदणी करून लसीकरण करून घ्या असे आव्हान वैद्यकिय अधिक्षक डॉ. डी. डी.गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिल्पा जाधव यांनी केले आहे

कोरोणा संसर्गाला रोखण्यासाठी 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र व राज्य शासनाने घेतल्याने शहरात 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस शहरातील ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर येथे देण्यात येणार आहे या वयोगटात इयत्ता दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होतो. त्यामूळे विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी शहरातील सर्व शासकीय, खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि कोचिंग क्लासचे सहकार्य घेण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिल्पा जाधव यांनी दिली आहे या विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्यास परीक्षेच्या वेळी होणारी भीती कमी होईल त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात दहावीत शिकणाऱ्या मुलांचे लसीकरण होणार आहे त्यामुळे शहरात वाढत असलेल्या ओमायक्रोन रुग्णांची प्रशासनाने लवकरच धास्ती घेऊन शहरात लसीकरणाचा वेग वाढवला आहे त्यामुळे 15 ते 18 वयोगटातील मुलांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे असे आव्हान हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालया कडून करण्यात आले आहे

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Unknown म्हणाले…
शाळेत ही लस किती पैसे देऊन देतील
Unknown म्हणाले…
शाळेत ही लस किती पैसे देऊन देतील

Top Post Ad

Below Post Ad