Type Here to Get Search Results !

आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याचा आंबेगाव जुन्नर कोषागार यांच्या चुकीच्या कार्यपध्दतीला थेट विरोध.

आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याचा आंबेगाव जुन्नर कोषागार  यांच्या चुकीच्या कार्यपध्दतीला थेट विरोध. निर्भीड भुमिके नंतर सकारात्मक चर्चा.सर्व कर्मचारी   वर्गाचे पगारा (वेतना) बाबत मह्त्वाचे प्रश्न मार्गी.   


 कोषागार अधिकारी आंबेगाव जुन्नर  तालुका श्री. कोकणे साहेब यांना आज दि.17/05/2021 रोजी आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना. 


महाराष्ट्र राज्य. यांनी सर्व कर्मचारी वर्गाच्या पगारा (वेतना) बाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन सकारात्मक चर्चा झाली. मा श्री. कोकणे साहेब कोषागार अधिकारी यांनी कर्मचारी वर्गाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.व ज्याचा आयकर कपात होणार आहे. त्यानुसार सर्व आदिवासी प्रकल्प कार्यालया अतंर्गत येणाऱ्या सर्व ddo यांनी ज्या कर्मचाऱ्यांना मागील वर्षी इन्कमटॅक्स बसला आहे. आणि यावर्षी बसणार आहे अशाच कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातुन ते कर्मचारी सांगतिल तेव्हढा इन्कमटॅक्स वजा करावा. आणि ज्या कर्मचाऱ्यांना इन्कमटॅक्स बसणार नाही अशा कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातुन इन्कमटॅक्स वजा करू नये. कोषागार अधिकारी श्री. कोकणे साहेब यांच्याशी या बाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यांनी संघटनेला आश्वासन दिले आहे की या पद्धतीने सर्व प्रश्न मार्गी लावू. श्री. कोकणे साहेब कोषागार अधिकारी आंबेगाव जुन्नर तालुका यांना निवेदन देताना. संघटनेचे घोडेगाव प्रकल्प अध्यक्ष मा.श्री. सागर शिंदे सर  घोडेगाव प्रकल्प कार्याध्यक्ष श्री  विलास दा. साबळे सर  श्री. ओव्हळ एस. पी. सर ठाणे विभाग उपाध्यक्ष. श्री. खाडे एच. बी.सर कोषाध्यक्ष. श्री.आब्दुल काठेवाडी. सर आंबेगाव तालुका संघटक घोडेगाव प्रकल्प प्रसिद्धी प्रमुख.

 संघटना मजबूत आहे मजबूर नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies