Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांची विज तोडाल तर तोंडाला काळे फासणार :- राहुल बिडवे

*शेतकऱ्यांची विज तोडाल तर तोंडाला काळे फासणार:राहुल बिडवे*



महाराष्ट्रात सध्या ऊन्हाळा वाढत चालला आसुन शेतकऱ्यांची पिके राज्यकर्त्यांच्या गलथान कारभारामुळे जळु लागली आहेत राज्य सरकारने शेतकऱ्यांचे वीज कापण्याची आदेश देऊन शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे धोरण सरकार राबवत आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांची वीज कापणार नाही असे जाहीर सांगितले असताना अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात युटर्न घेऊन शेतकर्यांची विज कापण्याचे जाहीर आदेश देऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करून खिल्ली उडवली आहे जर शेतकऱ्यांची वीज कापाल तर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार असा ईशारा रयत क्रांती संघटनेचे राहुल बिडवे यांनी सांगितले.




विधानसभेत विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी अधिवेशनाच्या सुरुवातीला वीज कापणार नाही असे जाहीर करून विरोधकांना शांत केले व अधिवेशन संपताच शेतकऱ्यांचे वीज कापण्याची आदेश दिले करोनाजन्य परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे मालाचे भाव गडगडले शेतकरी देशोधडीला लागला असताना शेतकरी मेटाकुटीला आला त्यांना मदत केली नाही उलट रासायनिक खताच्या किमती वाढवल्या दोन लाखावर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी पासून वंचित ठेवले त्यांना जरी सरकारने दोन लाखावर कर्ज असणार्या शेतकऱ्यांची कर्जे ताबडतोब माफ करावी तरी सरकारने शेतकऱ्यांची वीज कापु अन्यथा महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरेल व कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सरकार जबाबदार असेल असे रयत क्रांती संघटनेचे राहुल बिडवे यांनी सांगितले

*अधिवेशनात सरकारने विज तोंडणार नाही असे सांगितले नतंर विज तोंडण्याचे आदेश दिले हे सरकार तिनतोंडी सरकार आहे शेतकऱ्यांशी बेईमानी कराल तर हाच शेतकरी तुम्हाला मातीत गाडेल:आ.सदाभाऊ खोत*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News