Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन व अकोला टेनिस क्रिकेट असोसिएशन टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा लालबहादूर शास्त्री स्टेडियम अकोला येथे उत्साहात संपन्न



महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन व अकोला  टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने   6 वी सीनियर राज्य स्तरीय 

टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा लालबहादूर शास्त्री स्टेडियम अकोला




येथे उत्साहात संपन्न झाली. त्यामध्ये प्रथंम क्रमाक  परभणी,दूसरा क्रमाक  मुंबई उपनगर,तिसरा क्रमाक हिंगोली चौथा क्रमाक यवतमाळ शहर मूली संघामध्ये प्रथम क्रमाक  उस्मानाबाद दूसरा क्रमाक अकोला,तिसरा क्रमाक औरंगाबाद,चौथे स्थान अमरावती या संघांनानी मिळाल्याबद्दल त्यांचे राज्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.




या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी, टेक्निकल डायरेक्टर स्वप्निल ठोंबरे ,  ,विलास गिरी व.जिल्हाधिकारी अकोला. (भा.प्र.से.),मा. श्री. चंद्रकांतजी उप्पलवार, (माजी जिल्हा क्रीडा अधि.),मा. श्री. सतिषचंद्र भट्ट, (जिल्हा क्रीडा अधिकारी,अकोला), अकोला.




इत्यादी उपस्थित होते.राज्य  टेनिस क्रिकेट सचिव मिनाक्षी गिरी  यांनी खेळाडूंना  टेनिस क्रिकेट खेळाची माहिती व नियम सांगितले. या स्पर्धेसाठी राज्यातून मुलांचे15 संघ  व  मुलींचे 8  संघानी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचा अंतिम सामना  परभणी विरुद्ध मुबंई उपनगर  जिल्हा यांचा झाला.




परभणी ने चांगला खेळ करत संघाला विजयश्री मिळवला. मुबई उपनगर संघाने चांगले प्रयत्न करून या अंतिम सामन्यात चांगली चुरस निर्माण करून उपविजेता ठरला. तसेच हिंगोली संघाला तिसरा क्रमांक मिळाला तसेच मुलीच्या अतिंम सामना स्पर्धेचा  उस्मानाबाद विरुद्ध अकोला जिल्हा यांचा झाला. उस्मानाबाद ने चांगला खेळ करत संघाला स्वर्ण पदक मिळाले ,दूसरा क्रमाक अकोला ,तिसरा क्रमाक औरंगाबाद,चौथे स्थान अमरावती मिळविले त्याबद्दल  व संघाच्या चांगल्या कामगिरीबद्दल  महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मिनाक्षी गिरी, विलास गिरी ,स्वप्निल ठोंबरे ,महेश मिश्रा, नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड यांनी सर्व खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.तसेच पंच म्हणून  , 




संदीप पाटील,सिद्धेश गुरव, विजय उंबरे, श्रीकृष्ण देशमुख,ओमकार पवार,मानस पाटील,रोशन किरडवकर , पंकज सुर्वे, निलेश बुटे या सर्वांनी पंच म्हणून काम बघितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad