Type Here to Get Search Results !

केंद्रस्तरिय क्रीडा स्पर्धा मध्ये कोचाळे शाळेचे यश.



केंद्रस्तरिय क्रीडा स्पर्धा मध्ये कोचाळे शाळेचे यश.




आज किनीस्ते केंद्राच्या जिल्हा परिषद शाळा करोळ येथे पार पडलेल्या केंद्र स्तरीय विविध गुनदर्शन स्पर्धे मध्ये जिल्हा परिषद शाळा कोचाळे शाळेने इंग्रजीतून सादर केलेल्या आपत्ती व्यवस्थापन या नाटीकेस प्रथम क्रमांक तर समुहगान लहान गट मध्ये प्रथम क्रमांक , समुहगान मोठा गट द्वितीय क्रमांक आणि दुर्गा फसाळे हिच्या स्त्री सक्षीमीकरन या विषयावर सादर केलेल्या भाषणास द्वितीय क्रमांक प्राप्त करून शाळेचे नाव उज्वल केले विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक दिनकर फसाळे सर उपशिक्षक राजाराम जोशी , गणेश वाघ , दिनेश ठोमरे सर यांचे मार्गदर्शन लाभले . सदर स्पर्धा मध्ये किनिस्ते केंद्रातील नऊ शाळेच्या १५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता , कार्यक्रमास केंद्राचे केंद्रप्रमुख नागू वीरकर साहेब , केंद्रप्रमुख सखाराम रेरे साहेब , करोल शाळेचे मुख्याध्यापक साबळे सर आणि केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते. विजयी स्पर्धक , शाळांचे सर्वत्र कौतुक होत आहे .


मोखाडा प्रतिनिधी :सौरभ कामडी



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad