Type Here to Get Search Results !

औद्योगिक प्रशिक्षण संस्था जव्हार येथे रोजगार मेळावा संपन्न.



औद्योगिक प्रशिक्षण संस्था जव्हार येथे रोजगार मेळावा संपन्न.


पालघर जिल्हा प्रतिनिधी :- सुनिल जाबर


दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजी जव्हार, मोखाडा, विक्रमगड,वाडा तालुक्यातील बेरोजगार तरुण-तरुणींना विविध कंपन्यांमध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याकरिता औद्योगिक प्रशिक्षण संस्था जव्हार येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला.




कौशल्य, रोजगार उद्योजक्ता व नाविन्यता विभाग आणि मा. प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार यांचे कार्यालय तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था जव्हार यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

सदर मेळाव्याचे आयोजन करण्याकरिता आयुषी सिंह सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सदर मेळाव्याचे उद्घाटन विजय मोरे सहाय्यक प्रकल्प अधिकारी जव्हार यांच्या शुभहस्ते व संध्या साळुंखे सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास अधिकारी पालघर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडले.

सदर रोजगार मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी श्याम अंबाळकर प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था जव्हार जिल्हा पालघर उपस्थित होते. सदर रोजगार मेळाव्यामध्ये आठ औद्योगिक आस्थापना व सहा विविध महामंडळे त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad