Type Here to Get Search Results !

वावर वांगणी ग्रामपंचायत मधील जल जीवन मिशन ७ कोटी योजनेचा शुभारंभ.



वावर वांगणी ग्रामपंचायत मधील जल जीवन मिशन ७ कोटी योजनेचा शुभारंभ.


पालघर जिल्हा प्रतिनिधी:- सुनिल जाबर


   वावर वांगणी ग्रामपंचायत मधील जल जीवन मिशन योजनेचा ३ कोटी योजनेचा दि २३/१२/२०२२ रोजी शुभारंभ करण्यात आला. सदर ही योजना आवेश मोदी या सुपरवायजर आणि एजन्सी ने घेतली आहे.या योजनेचा वावर वांगणी ग्रामपंचायत मधील ३ महसूल गावामधील ५००० हजार हून अधिक लोकसंख्येला फायदा होणार आहे .गेल्या खूप वर्षा पासून वाघ नदी वरून वावर वांगणी ग्रामपंचायत मध्ये पाणी यावे हा प्रयत्न चालू होते.




    या अगोदर मुख्यमंत्री पेयजल योजना मधून सदर नळपाणी पुरवठा योजना करिता पाठपुरावा चालू होता परंतु काही तांत्रिक अडचणी मुळे त्यावेळी सदर योजना मंजूर होवून टेंडर प्रोसेस ला रद्द झाली होती त्या नंतर ही पाठ पुरवा करीत सदर योजना जल जीवन योजनेतून मंजूर होवून आज त्याचा शुभारंभ करण्यात आला असून लवकरच वावर वांगणी ग्रामपंचायत मधील सर्व घराला पाणी मिळणार याचे समाधान आहे .




यावेळी वावर वांगणी ग्रामपंचायत चे उपसरपंच रमेश बीज बोलताना याचा खास करून सागपाणी आणि रीठीपाडा या पाडे मध्ये खूप वर्षा पासून पाणी टंचाई होत असून या दोन पाड्याना खूप मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले आहे.




   यावेळी ही योजना मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच गटविकास अधिकारी सुनिल पाटील,जिल्हा परिषद सदस्य मनिषा बुधर पंचायत समिती सदस्य ज्योती बुधर,वावर वांगणी ग्रामपंचायत चे नवनिर्वाचित सरपंच विनोद बुधर,उपसरपंच रमेश बीज, यशवंत बुधर तसेच वावर वांगणी ग्रामपंचायत चे सर्व सदस्य व इतर अधिकारी वर्ग यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad