Type Here to Get Search Results !

सोलापुर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मिरे येथील किरण नवगिरे हिची भारताच्या महिला क्रिकेट संघात इग्लंड दौऱ्यासाठी निवड




सोलापुर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मिरे येथील किरण नवगिरे हिची भारताच्या महिला क्रिकेट संघात इग्लंड दौर्यातील टी-२० सामन्यासाठी निवड झालेली आहे.अनघा देशपांडे नंतर भारतीय संघात स्थान मिळवनारी किरण सोलापुरची दुसरी खेळाडु आहे.

प्रतिकुल परिस्थितीतुन श्रीपुरच्या चंद्रशेखर विद्यालयात शिकत विविध क्रीडा स्पर्धा गाजवत पुढे पुणे विद्यापिठाच्या महिला क्रिकेट संघ,तसेच नागालँड,अरुणाचल प्रदेश कडुन खेळत सराव,सातत्य यातुन भारतीय महिला संघात स्थान मिळवले आहे.
किरणचे हे यश आपना सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने तिचे खुप खुप अभिनंदन व पुढील कारकिर्दीस शुभेच्छा!

भारताची दिग्गज वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी हिचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे . आगामी इंग्लंड दौन्यासाठी भारतीय नियामक मंडळाने ( बीसीसीआय ) शुक्रवारी रात्री जाहीर केलेल्या एकदिवसीय संघात झूलनची वर्णी लागली . महाराष्ट्राची परंतु देशांतर्गत स्पर्धेत नागालँडकडून खेळणाऱ्या किरण नवगिरेची पहिल्यांदाच भारतीय संघात झालेली निवड लक्षवेधी ठरली . किरणने यंदाच्या महिला टी -२० चॅलेंज स्पर्धेत व्हेलोसिटीकडून खेळताना ट्रेलब्लेझर्सविरुद्ध 34 चडूत 69 धावांचा तडाखा देताना ५ गगनचुंबी पटकार खेचले होते .

भारताचा टी -२० संघ 

हरमनप्रीत कौर ( कर्णधार ) , स्मृती मानधना ( उपकर्णधार ) , शेफाली वर्मा , दीप्ती शर्मा , पूजा वस्त्रकार , जेमिमा रॉड्रिग्ज , स्नेह राणा , रेणुका ठाकूर , मेघना सिंग , राधा यादव , सब्बीनेनी मेघना , तानिया भाटिया ( वष्टिरक्षक ) , राजेश्वरी गायकवाड , डी . हेमलता , सिमरन बहादूर , रिचा घोष ( यष्टिरक्षक ) आणि किरण नवगिरे , जेमिमा रॉड्रिग्ज .

 एकदिवसीय संघ 

हरमनप्रीत कौर ( कर्णधार ) , स्मृती मानधना ( उपकर्णधार ) , शेफाली वर्मा , सब्बीनेनी मेघना , दीप्ती शर्मा , तानिया भाटिया ( यष्टिरक्षक ) , यास्तिका भाटिया ( यष्टिरक्षक ) , पूजा वस्त्रकार , स्नेह राणा , रेणुका ठाकूर , मेघना सिंग , राजेश्वरी गायकवाड , हरलीन देओल , डी . हेमलता , सिमरन बहादूर , झूलन गोस्वामी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad