श्री विठ्ठल सहकारी साखर साखर कारखाना लि. वेणूनगर, गुरसाळे चे चेअरमन माननीय.श्री. अभिजीत (आबासाहेब) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कान्हापुरी येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन
श्री भैरवनाथ फाऊंडेशन मित्र परिवार व अभिजीत आबा पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या तरुणांच्या व रक्तदात्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय. श्री. मोतीराम दादा गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भैरवनाथ फाऊंडेशन चे सर्व कार्यकर्ते व मित्र परिवार व समस्थ ग्रामस्थ उपस्थित होते
या रक्तदान शिबिरात सत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी अक्षय ब्लड बँक सोलापूर यांचं मोलाचं सहकार्य लाभले भैरवनाथ फाऊंडेशन चे अध्यक्ष व माजी उपसरपंच दादासाहेब शिंदे यांनी सर्व रक्तदात्यांचे अक्षय ब्लड बँक सोलापूर व ग्रामस्थ व कार्यकर्ते यांचे आभार मानले