Type Here to Get Search Results !

गोंडपीपरी वन तलावाजवळ टीपरच्या धडकेत एक युवक ठार तर एक जखमी




गोंडपीपरी लगतअसलेल्या वन तलावाजवळ विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या टिप्परने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

म्रुतकाचे नाव परिमल बोरकर वय 18 वर्ष तर जखमी युवकाचे नाव संजय रासपल्ले दोघेही राहणार दिघोरी येथील आहेत.

दहेली येथील डांबर प्लांट वरून डांबर मिश्रित घेऊन जाणारा टिपर क्रमांक एम एच 34 बी जी5029 हा चामोर्शीच्या दिशेने जात होता तर दिघोरी येथून दूचाकिने कामानिमित्त चंद्रपूरला परिमल व संजय गोंडपीपरी मार्गजात असताना वन तलावाजवळ येताच अपघात घडला.या अपघाता परिमल चे दोन्ही पाय निकामी झाले.

तर संजय रासपल्ले यांच्या हाताला जबर मार लागला आहे.

जखमी अवस्थेत विव्हळत असताना 
परिमल बोरकर व संजय यांना ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने चंद्रपूरला नेत असताना बोरकर यांचा मृत्यू झाला .
तर संजय वर उपचार सुरू आहे.

मनोज गोरे प्रतिनिधी चंद्रपूर 
 गोंडपीपरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies