Type Here to Get Search Results !

हिमायतनगर | तालुकास्तरीय वसंतराव नायक जयंती निमित्त गोर गुणवंत विद्यार्थी सत्कार





2 जुलै देवतुल्य वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त दोन जुलै रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मोठ्या उत्साहात पार पडला व 84 विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित केले.






गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष अरुण भिया चव्हाण यांच्या मार्गदर्शनाणे वसंतराव नायक जयंती निमित्त गोर गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यामध्ये दहावी व बारावी च्या हिमायतनगर तालुक्यातील 84 विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन त्यांच्या सह विद्यार्थ्यांच्या आई वडिलांचे सत्कार करण्यात आला. 


स्व:ता वसंतरावजी नायक साहेब यांच्या बद्दल काही बोलायचं म्हणजेज जर दोन वर्षात महाराष्ट्र राज्याला अन्नधान्या पासुन स्वयंपुर्ण न केल्यास याच शनिवार वाड्यामध्यॆ मला जाहिर फाशी दॆण्यात याव अशी घोषणा करणारे हरित क्रांतीचे प्रणेते रोजगार हमीचॆ जनक,महाराष्ट्र राज्यावर सलग ११ वर्षॆ अधिराज्य गाजवणारॆ माजी मुख्यमंत्री महानायक मा.वसंतरावजी नायक साहॆब यांच्या १०९ वी जयंती निमित्त




 हिमायतनगर तालुकास्तरीय व गोर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व कोविड योद्धा म्हणून डॉक्टर पोलीस व पदोन्नती व नवीन कर्मचारी यांना सन्मानपत्र देऊन सत्कारमूर्ती म्हणून करण्यात आला त्यावेळेस यवतमाळ जिल्ह्याचे संजय पालत्य यांची प्रमुख उपस्थिती होती. व कोविड योद्धा म्हणून डॉक्टर दामोदर राठोड व त्यासह अनेक कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. 




हिमायतनगर तालुक्यातील प्रमुख पाहुणे म्हणून राम राठोड बालाजी राठोड अडवोकेट दिलीप राठोड गुलाब राठोड शिल्पाताई राठोड प्रकाश जाधव पारस राठोड रवी जाधव अतुल जाधव व समाजातील सर्वच घटक उपस्थित होते कार्यक्रमात दरम्यान हादगाव हिमायतनगर तालुक्याचे नेते बाबुराव कोळेकर साहेब यांनी कार्यक्रमास भेट देऊन कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करून वसंतराव नाईक व सद्गुरू सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पूजन केले. कार्यक्रमाचे आयोजन गोरसेना हिमायतनगर टिम गोरसिकवाडी तालुका संयोजक डॉक्टर बधूसिंग जाधव गोर सेना जिल्हा उपाध्यक्ष लखन जाधव डाय साळे दळ तालुका प्रमुख प्रकाश जाधव व गोर सेना या लावालस्कर सुनील चव्हाण अतुल राठोड नितीन राठोड कृष्णा गण्णा राठोड अजय जाधव धरमसिंग आडे पांडुरंग आडे सुभाष चव्हाण गजू चव्हाण राजू राठोड कृष्णा राठोड यासह तालुक्यातील अनेक गोर सैनिकांनी या कार्यक्रमास मेहनत घेतली.

उमरखेड प्रतिनिधी संजय जाधव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News