Type Here to Get Search Results !

कोरपना | गडचांदुरात कांशीराम यांची जयंती साजरी

                     गडचांदुरात कांशीराम यांची जयंती साजरी


चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे

कोरपना तालुक्यातील गडचंदुर इथे बहुजन नायक कांशीराम यांच्या 88 व्या जयंती निमित्य प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बहुजन समाज पार्टी जिल्हा चंद्रपूर प्रभारी भास्कर कामटकर होते.त्यांनी कांशीराम यांच्या जीवनचरित्रावर माहिती दिली.

प्रमुख अतिथी विश्वास विहीरे यांनी कांशीराम यांनी केलेला त्याग लक्षात घेऊन बहुजन समाजाला सत्ताधारी बनविण्यासाठी काम केले पाहिजे असे आवाहन केले.प्रा.देवराव ठावरी यांनी बहुजन समाजाच्या असलेल्या समस्या सोडविण्यासाठी काम केले पाहिजे असे आवाहन केले.

यावेळी प्रा.कीर्तीकुमार करम नकर ,मारोती लोखंडे,शहर अध्यक्ष प्रा.भानुदास पाटील,मनोहर साखरे , राजुरा विधानसभा अध्यक्ष प्रा.संदिप आदे,पांडुरंग तुमराम यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवी पथाडे,शंकर ताडे,जिवलग उमरे ,हनुमान बेरड ,मुकुंदा धोंगडे,राजेंद्र पाटील ,मानकर ,वाघमारे ,ताकसांडे,भोयर ,प्रकाश कवाडे ,नामदेव लांडगे ,वाघाडे ,बामसेफ कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सयाजी लोणारे ,सुत्रसंचालन रामदास बुचुंडे तर आभारप्रदर्शन दशरथ डांगे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad