Type Here to Get Search Results !

पोलिस स्टेशन बिटरगांव येथील ठाणेदार प्रताप भोस यांच्या मुळे अवैध धंदे नियंत्रणात.

पोलिस स्टेशन बिटरगांव येथील ठाणेदार प्रताप भोस यांच्या मुळे अवैध धंदे नियंत्रणात.


 प्रतिनिधी निगंनुर. मैनोदिन सोदागर

  बिटरगांव पोलिस स्टेशन येथील अवैध धंदे करणाऱ्यांचे अलीकडे चांगलेच धाबे दणाणले असून अवैध धंदे करणारे धास्तावले आहेत.बिटरगांव पोलिस स्टेशन च्या अगोदर अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले होते .परंतु पोलिस विभागाचे नियंत्रण सुटल्यात जमा होते. पण जेव्हा पासून ठाणेदार .प्रताप भोस बिटरगांव पोलिस .ठाण्यात रूजू झाले तेव्हा पासून अवैध धंदे करणाऱ्या नागरीकावर चांगलाच चोप. बसला आहे. काहींनी तरी ठाणेदार यांच्या भीतीने स्थलांतर करून घेतले आहे. ठाणेदार यांनी अवैध धंद्यावर नियंत्रण मिळविले असून बिटरगांव पोलिस स्टेशनला कायदा व सुव्यवस्था राखण्यातही मोठ्या प्रमाणात यश मिळविले आहे. अगोदर सामान्य माणसाला पोलिस स्टेशनमध्ये जान्यासाठी. भीती वाटत होती परंतु आता बिटरगांव पोलीस स्टेशनमध्ये .नागरीकांना सौजन्याची. वागणुक मिळत असून आता सामान्य माणूसही पोलिस स्टेशनमध्ये न घाबरता जावून आपली तक्रार दाखल करायला लागला आहे. विशेष म्हणजे बिटरगांव पोलिस स्टेशनच्या हाद्दिमध्ये येत आसलेल्या गावामध्ये गुन्ह्याचे प्रमाण कमी करण्यात ठाणेदार यांनी यश मिळविले आहे. त्यांच्या सोबत असलेले एक पोलिस उपनिरीक्षक व सर्व पोलीस सहकाऱ्यांची सुध्दा कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणेदार प्रताप भोस यांना कमालीची साथ मिळत आहे. एकंदरीतच बिटरगांव पोलीस स्टेशनचा कारभार अतिशय व्यवस्थित सुरू असून नागरीकांच्या अभिनंदनास पात्र ठरत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad