Type Here to Get Search Results !

संत रविदास महाराज फुलसावंगी येथे मोठ्या उत्साहात साजरी

संत रविदास महाराज फुलसावंगी येथे मोठ्या उत्साहात साजरी



महागाव प्रतिनिधी:- संजय जाधव

फुलसावंगी : संत रविदास महाराज मंदिर येथे संत रोहिदास महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. 


याप्रसंगी सायंकाळी फुलसावंगी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात युवकांनी संगीत संच राहूर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याकार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नागोराव मिराशे, प्रमुख अतिथी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस तसलीम शेख यांची उपस्थिती होती. महामानवाचे विचार केवळ बोलून वाचून चालणार नाही तर त्यांचे ते महान विचार अंगिकरण्याची गरज असल्याचे मत अल्पसंख्याक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस तसलीम शेख यांनी वक्त केले.


नवाब जानी, रवी पांडे, कुणाल नाईक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच शीतल भिसे, बाबुखान पठाण, दिनेश नाईक, डॉ. चंदन पांडे, अमर दळवे, गणेश भगत, बापुराव व्हडगिरे, गजानन प्रतापवार, विजय पत्रकार संघाचे अध्यक्ष तानाजी शिंदे, नीलेश बोंडारकर, सचिन अलट, मुन्ना ढाले, शिवप्रसाद डोंगरे, सुदर्शन खंदारे फुलसावंगी पत्रकार संघाचे सर्व सदस्य यांची उपस्थिती होती. संचालन विठ्ठल सोनुने यांनी केले. जगलू खंदारे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad