Type Here to Get Search Results !

करकंब ग्रामस्थांच्या सहकार्यातून जागर स्वच्छता टीमने घेतला करकंब गाव स्वच्छतेचा वसा

करकंब ग्रामस्थांच्या सहकार्यातून जागर स्वच्छता टीमने घेतला करकंब गाव स्वच्छतेचा वसा
करकंब करांनी तन मन धनानी एकत्र येऊन जागर स्वच्छता अभियान टीमच्या अभियानात सहभागी व्हावे :-गोविंद जाधव
करकंब:-आपल गाव आपली जबाबदारी या संकल्पनेतून आपल्या सर्वांना आरोग्य चांगले असावे वाटते.आपले हक्क मिळाले पाहिजेत वाटत,पण आपली कर्तव्य मात्र विसरून जातो.या भावनेतून खारीचा वाटा म्हणून जागर स्वच्छता अभियान करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान व सर्व करकंब ग्रामस्थ, सर्व सामाजिक संघटना, यांच्या सहभागातून करकंब गाव स्वच्छ करण्याचा शुभारंभ करकंब येथे गणेश टेकडी मंदिरात श्री.गणेशाची संत गाडगेबाबा व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पूजा करुन करण्यात आला.यावेळी कर्जत शहराचे मुख्याधिकारी गोविंद जाधव,बाळासाहेब देशमुख, राहूल पुरवत,अँड शरदचंद्र पांढरे,सतिश देशमुख, अमोल शेळके, शहाजी काळे,सागर थिटे, सुर्यकांत बनकर,मनोज पवार,राजेश.करपे, एल.एम जाधव,डॉ.विनोद शिंगटे पांडुरंग नगरकर. संजीवकुमार म्हेत्रे,बापू शिंदे.नागनाथ गायकवाड,सुनील दुधाणे,सुरेश शिंदे,बाळासाहेब वास्ते,ऋषीकेश वाघमारे रमेश खारे,आदी पदाधिकारी सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी सागर थिटे.सुर्यकांत बनकर, राजू अनवते,सचिन शिंदे,सतिश देशमुख, संजीवकुमार म्हेत्रे,बाळासाहेब घाडगे,नंदलाल कपडेकर,राहुल पुरवत,बाळासाहेब देशमुख, मनोगतात सांगितले की करकंब गाव ऐतिहासिक आहे आणि या गावात स्वच्छता अभियान सुरू होतय खुप मोठी गोष्ट आहे.यानंतर सर्व मान्यवरांनी स्वच्छता अभियान राबवण्यासाठी सर्व सहकार्य दिले जाईल.हे अभियान गावाच कस होईल,यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न राहवा. गोविंद जाधव यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगताना सांगितले की हे स्वच्छता अभियान राबवण्यासाठी नियमितता पाहिजे.सर्वांचा सहभाग असला पाहिजे. आणि आपल गाव स्वच्छ राहव ही भावना प्रत्येकाची असली पाहिजे. शिवाय सर्व करकंबकरांना स्वच्छतेची जन जागृती निर्माण करुन दिली पाहिजे, कचऱ्यामुळे होणारे नुकसान,धोका,ओला कचरा, सुका कचरा,याविषयी जागृती होणे आवश्यक आहे. शिवाय सर्व शाळेतील मुलांना स्वच्छतेच्या सवयी लावण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.हे अभियान राबवताना सुरुवातीला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. मेहनतीच काम आहे.पण ह्या कामात सातत्य ठेवले तर समाजिक भावनेतून केलेल्या कामाचा आनंद हा द्विगुणीत असतो.आणि लोक आपोआप जोडले जातील.याचा अनुभल कर्जत शहर स्वच्छ करताना आला गेले ४९२दिवस अखंड स्वच्छता चालू असताना आला.कर्जत शहरात एक पोतभरही कचरा तुम्हांला सापडणार नाही यासाठी कचरा दाखवा लाख रुपये मिळवा हे घोषवाक्य तयार केलेय,आम्ही यावरुन स्वच्छता कशी असेल याची कल्पना येते.कचरा होऊच नये यासाठी सर्वांना डस्टबीन देणे जरूरीचे आहे,ज्या भागातील आपण स्वच्छता करणार आहोत त्या भागात आधी कल्पना देऊन तेथील ग्रामस्थांना सहभागी करुन घेतल.तर अधिक सहभाग वाढेल,
 सार्वजनिक ठिकाणी कचरा करणे हा दंडणीय अपराध आहे.जर लोक सांगून ऐकत नसतील तर कार्यवाही ही प्रशासनान केली पाहिजे असही मत जाधव साहेबांनी व्यक्त केले. या नंतर काही प्रश्न विचारले ह्या अभियानास अर्थिक सहकार्य लोकांनी केल पाहिजे. वाढदिवस. लग्न,घरगुती कार्यक्रम या निमित्ताने या उपक्रमात यथाशक्ती देणगी दिली तर हे आणखी व्यापक स्वरूपात अभियान राबेल.याला सर्व पदाधिकारी यांचा राजाश्रय तितकाच मोलाचा आहे ,यानंतर सर्व ग्रामस्थांच्या वतीने गणेश मंदिर परिसर साफ करण्यात आला. यावेळी जागर स्वच्छता अभियानाच्या महिला व स्वच्छता प्रेमी करकंब नागरिकांच्या वतीन महिन्यातून पहिला व तिसऱ्या रविवारी दुपारी३ते६ ही स्वच्छता मोहीम राबवण्याचा संकल्प केला. व पुढील काळात ही असेच सहकार्य करावे.यावेळी संजय दुधाणे यांनी अभियानावर सुंदर कविता सादर केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकल्पक राणी दुधाणे.देवकी दुधाणे ,वनिता दुधाणे,यांनी केले.प्रास्ताविक अंजली टकले यांनी केले. तर आभार धनश्री काटवटे यांनी मानले यावेळी स्नेहा दुधाणे, सविता गळीतकर,सविता दुधाणे,वृषाली बोधे,सीमा घाडगे,अमृता रसाळ,अनुपमा दुधाणे, उषा दुधाणे,शैला दुधाणे. सायली दुधाणे,आशा टकले,प्राजक्ता शिंदे,दिपाली म्हेत्रे,सुलभा दुधाणे. राधिका इदाते,वंदना दुधाणे,ग्रामपंचायत स्वच्छता महिला कामगार,स्वच्छता प्रेमी नागरिक संगीता करमाळकर,सुवर्णा स्वामी संतोष स्वामी,सज्जन खडके, मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब घाडगे,राजू अनवते करकंब गावच्या लेकीचं झाड अभियानाचे ज्ञानेश्वर दुधाणे, पांडुरंग काटवटे,विजय जाधव नंदलाल कपडेकर,प्रमोद रेडे, हरिश्चंद्र वास्ते,अक्षय नगरकर आत्माराम चवरे.गणेश पिसे,संजय दुधाणे,माऊली मुखरे,चेतन पुरवत,अक्रुर शिंदे,शुभम टकले,महेश गायकवाड.नागेश खारे,धोंडीराम भाजीभाकरे,हेमंत टकले,सुनिल मेहरकर,आदित्य म्हेत्रे,विक्रम म्हेत्रे,आदिंनी सहकार्य केले*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad