Type Here to Get Search Results !

कुटुंब वात्सल्य संजय गांधी | निराधार योजना उमरखेड तहसील अंतर्गत शिबिर संपन्न

कुटुंब वात्सल्य संजय गांधी | निराधार योजना उमरखेड तहसील अंतर्गत शिबिर संपन्न


उमरखेड प्रतिनिधी:- संजय जाधव
                                 उमरखेड :- दि२८ उमरखेड तालुक्यातील निराधार महिलांना शासनाकडुन काही तरी लाभ मिळावा यासाठी उमरखेड तालुक्यामध्ये कुंटुब वात्सल्य संजय गांधी निराधार योजने अंतर्गत नाविन्यपुर्ण उपक्रम मिशन वात्सल्य शिबिर घेण्यात आले. 



 या शिबिराचे आयोजन तहसील कार्यालय उमरखेड येथे . या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती उमरखेड महागाव विधानसभेचे मा. आ.नामदेवराव ससाने, न्यायाधीश तट साहेब ॲन्ड. आगलावे ,तहसीलदार आंनद देऊळगावकर ,आदि मान्यवराचे मार्गदर्शन झाले. 

या कार्यक्रमाला मोठ्याप्रमाणात विधवा महिलांनी अर्ज सादर केले. परीसरातील विधवा महिला नी कुंटुब वात्सल्य संजय गांधी निराधार योजना व विविध योजनाचा फायदा महिलांना मिळावा यासाठी उमरखेड तालुक्यातील कुपटी, मुळावा, चुरमुरा,मेट, मन्याळी,बिटरगाव ,दराटी,वालतुर निगनुर,चिखली टेबुंधरा बदीभागातील मोरचडीं ,बदींटाकळी सेवलाल नगर ,यागावातील मोठ्या प्रमाणात विधवा महिलांनी सहभाग घेतला व अर्ज सादर केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad