Type Here to Get Search Results !

कल्याण डोंबिवली मध्ये दैवत फाउंडेशन मार्फत अन्नदान कार्यक्रम संपन्न

*कल्याण डोंबिवली मध्ये दैवत फाउंडेशन मार्फत अन्नदान कार्यक्रम संपन्न*
 
कल्याण/ प्रतिनिधी
       दैवत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य मार्फत गुरूपौर्णिमेचे औचित्य साधत अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला  होता. पाऊस असताना सुद्धा पदाधिकारी व सदस्यांनी हा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पाडला.  कसल्याही परिस्थितीत गरजूंना उपाशी राहु न देण्याचा प्रण फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला होता. त्या दृष्टिकोनातून गरीब आणि गरजू ना आज दिवसभर अन्नदान करण्यात आले. या अन्नदान कार्यक्रमाला शिवाजी टेक्निकल एज्युकेशन सोसायटी घाटकोपर चे प्रोफेसर निवृत्ती दफिफळे सर  यांचे मार्गदर्शन लाभले.  तसेच कल्याण डोंबिवली अध्यक्ष प्रथमेश दहिफळे, अमर कवडे, राहेन गजबे, संस्थापक परम जवरे, प्रदेशाध्यक्ष डॉ.अभिराज गिते, सचिव विजय ढाकणे व संचालक महादेव मुंढे यांच्या पुढाकाराने  हा कार्यक्रम पार पाडण्यात आला. यावेळी दैवत फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे कल्याण डोंबिवली परिसरातील सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad