Type Here to Get Search Results !

भारतीय सैन्य दलात 17 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या दोन सख्या बंधूंचा सन्मान


आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सुरवातीला भारतीय सैन्य दलात 17 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या दोन सख्खे बंधू सैनिक असलेले श्रीकृष्णा बाळासाहेब कुचिक व श्रीगणेश बाळासाहेब कुचिक यांचा शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला . दोघांनीही आपल्या सेवा काळात कारगील, ,लडाख, पिठोरागड ,राजस्थान , वाघा बॉर्डर इत्यादी ठिकाणी सेवा केली आहे . यावेळी पतसंस्थेचे सभापती श्री नारायण गोरे उपसभापती दत्तात्रय मेचकर , सचिव बाळासाहेब सैद , पुणे जिल्हा प्राथ.शिक्षक संघ उपाध्यक्ष नंदु चासकर ,शिक्षकनेते श्री . विजय घिसे , प्रवक्ते विजय डोके , सेवानिवृत्त संघटना अध्यक्ष श्री. भास्कर लोंढे , कोषाध्यक्ष कपिल कांबळे , मा .सभापती श्री .राजाराम काथेर , केंद्रप्रमुख साहेबराव शिंदे , श्री. ठकसेन गवारी सर्व संचालक मंडळ व आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. श्री कपिल कांबळे यांनी प्रास्ताविक केले तर श्री . भास्कर चासकर यांनी आभार मानले*.
प्रतिनिधी आकाश भालेराव 
घोडेगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad