Type Here to Get Search Results !

दगडथर येथे संत सेवालाल महाराज यांची मोठ्या उत्साहात 284 जयंती साजरी



दगडथर येथे संत सेवालाल महाराज यांची मोठ्या उत्साहात 284 जयंती साजरी

प्रतिनिधी :- संजय जाधव


महागाव तालुक्यातील दगडथर येथे मोठ्या उत्साहात संत श्री सेवालाल महाराज याचीं 284जयंती साजरी करण्यात आली असून संपूर्ण समाजातील महिला पारंपारिक वेशभूषा आणि पारंपारिक पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली. गावात प्रत्येक वारडात रॅली काढण्यात आली. सेवालाल महाराज यांची पालखी घेऊन संपूर्ण गावात मिरवनुक फिवरण्यात आली गावातील लहान मुले लेझीम पथक सोबत घेऊन नृत्य करत होते समाजातील प्रत्येक अविवाहित मुली कळस घेऊन रॅलीसोबत होत्या.




दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा संत सेवालाल महाराज जयंती दिनी गावात महाप्रसादाचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते उपस्थित सर्व समाज बांधवानी या महप्रसादाचा लाभ घेतला आहे.




दगडथर येथील संपूर्ण समाजबांधव उपस्थित होते दगडथर येथील गावकरी मोठ्या जल्लोषात होते . उपस्थीत गावातील सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील, नायक, कारभारी, गोर सेना गोर शिकवायचे कार्यकर्ते व गावातील तरुण वर्ग महिला मंडळ अन्य प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थित संत सेवालाल महाराज यांची 284 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad