Type Here to Get Search Results !

भाजपच्या आष्टी जिल्हा परिषद गटात गाव तेथे शाखा स्थापन करून बूथ सक्षमीकरण करणार. भागवत देवसरकर यांची माहिती.




भाजपच्या आष्टी जिल्हा परिषद गटात गाव तेथे शाखा स्थापन करून बूथ सक्षमीकरण करणार. भागवत देवसरकर यांची माहिती.

हिमायतनगर प्रतिनिधी, जांबुवंत मिराशे/

भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झालेल आहे,येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात जाऊन केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या माध्यमातून तसेच माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर,माजी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती सूर्यकांताताई पाटील,जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर,प्रवीणभाऊ साले,जेष्ठ नेते बाळासाहेब पांडे,पंडितराव देशमुख, तालुका अध्यक्ष तातेराव वाकोडे,सर्कल प्रभारी सुधाकर पाटील सोनारीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब, कष्टकरी, शेतकऱ्यासाठी समाज उपयोगी व गावाच्या सर्वागीण विकासाची कामे करून प्रत्येक गावामध्ये भाजपाच्या सक्षम शाखा स्थापन करून बूथ सक्षमीकरण करून पक्षाचे विचार प्रत्येक घराघरात पोहोचविनार असल्याची माहिती आष्टी जिल्हा परिषद गटात नुकतेच भाजपात प्रवेश केलेले शेतकरी सामजिक चळवळतील सक्रिय पदाधिकारी भागवत देवसरकर यांनी 91 इंडीया न्यूज शी बोलतांना दिली आहे.

देशात व राज्यात एक नंबर असलेला पक्ष हदगाव तालुक्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे,या पुढील काळात हदगाव तालुक्यात पक्षाला चांगले दिवस येऊन,पक्ष एक नंबरवर नेण्यासाठी सर्व नवे जुने पदाधिकारी यांना सोबत घेऊन पक्ष बांधणीसाठी विशेष प्रयत्न करून येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी तयारी करून सर्व ठिकाणी भाजपचे उमदेवार विजयी होण्यासाठी पक्षातील वरिष्ठ मंडळीचे मार्गदर्शन व तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रत्येक गट, व गणनिहाय बैठका घेऊन पक्षाची बांधणी व बूथ सक्षमीकरण येणाऱ्या काळात करणार असल्याचेही भागवत देवसरकर यांनी सांगितले आहे.

पुढील काळात राजू मोरे,बापुराव घारके,भगवान कदम,तालुका उपाध्यक्ष शेषराव वाकोडे सर्कल प्रमुख मोरेश्वर माने,अनुप पाटील वाळकीकर, सुनिल पाटील देवसरकर,पांडूरंग जाधव,गजानन चव्हाण,अविनाश कदम,शेख रहिम,गजानन पोकळे,युवराज पाटील शिंदे,आविनाश सुर्यवंशी,ओम इंदेवार,आनंदराव दांगट,नागेश कोल्हे,अंकुश शिंदे,स्वप्नील रामगिरवार,शिवाजी सुर्यवंशी, राजु भोस्कर,मंगेशराव थोबाळे,नामदेव खोकले,सुधाकर आडे,प्रकाश आडे,दशरथ हंमद,संजय चंदापुरे,पिंटू हुंडेकर,नागेश मेकेवार,सतीश शिंदे,नितीन फाळके,योगेश सूर्यवंशी,भीमराव पवार,भाऊराव मेंडके, शेषेराव पाटील वानखेडे,रामराव माने,शिवाजी भिसे,संतोष धोबाले,दुनाजी हूगे, गजनान चंदणवार,सुनिल कदम,गजानन जायनुरे,अनिल लक्षटवाड,बाळू पाटील कदम,रामा फिस्के यांच्यासह सर्व बूथप्रमुख,शक्तीप्रमुख,गणप्रमुख,सर्कलप्रमुख,व सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते यांना सोबत घेऊन पक्ष बांधणीसाठी व शाखा स्थापन करण्यासाठीं विशेष मोहीम रबिवणार असल्याचे भागवत देवसरकर यांनी माहिती दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News